Tuesday, July 29, 2008

'हे जग मी सुन्दर करुन जाईन----'

'हे जग मी सुन्दर करुन जाईन----'
- पु लं देशपांडे
http://www.puladeshpande.net/jskj.php

Monday, July 21, 2008

हो!!.. तू आहेसच रुक्ष अन् काटेरी निवंडुग.. अन् मी कोण??. अफाट वाळवंटात.. हजारो मैल प्रवास करून..फक्त तुझ्याचसाठी येणारा एक पावसाळी ढ़ग...













हो!!.. तू आहेसच रुक्ष अन् काटेरी निवंडुग..
अन् मी कोण???..

अफाट वाळवंटात.. हजारो मैल प्रवास करून..
फक्त तुझ्याचसाठी येणारा..
एक पावसाळी ढ़ग...



Thursday, July 17, 2008

साधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगायचं...

साधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगायचं...
साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण सांगायला थोडंच हवं

ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!
मनात जे जे येतं ते ते करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं जगावंसं वाटेल तसं जगायचं...

आपला दिवस होतो जेंव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेंव्हा झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं जसा सिंह रानात!

आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं आपणच कौतुक करायचं
असेलही चंद्र मोठा त्याचं कौतुक कशाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून घरभर शिंपत रहायचं
साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं रडावंसं वाटलं तर रडायचं


-- प्रसाद शिरगांवकर

एक प्रवास मैत्रीचा

[ कवीचं नाव माहिती नसल्याने क्षमस्व.. तरीही कविता छान आहे]
एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्षणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्षणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा
इथे हळुच येवुन विसावलाय..एक प्रवास

Tuesday, July 8, 2008

Sant Dnyaneshwar : Dnyneshwari


संत तुकाराम अभंग



सर्वाभुती॥

आधी बीज एकल ..

वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें॥॥

सदा माझे डोळा..

संत तुकाराम मराठी अभंग

विट्ठल पुजा, पंढरपुर

विट्ठल.. विट्ठल.. विट्ठला..












**************************************************
Video Songs:
By Anuradha Paudwal




Gujarati Song by Amee Joshi: